Satyaupasak News

satyaupasak

“गणवेश योजनेत अनियमितता; आदित्य ठाकरेंकडून केसरकरांवर गंभीर आरोप,,

Nagpur : राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरू केली होती. मात्र, महायुती सरकार 2 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळत नवी नियमावली बनवली आहे. या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे, ही योजना वादात…

Read More
satyaupasak

“जंगलात गाडी, गाडीत मोठं गुपीत; 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोख रक्कम जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आयकर विभागाने छापा टाकून मोठी संपत्ती आणि सोनं जप्त केलं आहे. भोपाळजवळील मंडोरे जंगलात एक लावारिस गाडी असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. “भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठा ऐवज हाती लागला असून सोन्याच्या (Gold) विटांसह मोठी रोख रक्कम आयकर विभागाने हस्तगत केली आहे. येथील जंगलातून…

Read More

भारतीय अर्थव्यवस्था संकटात? रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण; कोणत्या कारणांमुळे घडतेय ही परिस्थिती?

Rupee At All-Time Low: रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण होत असून 17 डिसेंबरच्या सत्रात एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य प्रथमच 84.93 रुपयांपर्यंत घसरले आहे. आज रुपयामध्ये सहा पैशांची घसरण नोंदवली गेली आहे. डॉलरच्या तुलनेत सतत घसरत असलेल्या रुपयामुळे आता भारतीय चलन 85 रुपयांची पातळी गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी, 16 डिसेंबर 2024 रोजी वाणिज्य मंत्रालयाने…

Read More

शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा ◾छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

सातारा, दि. 8: ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी , शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे…

Read More

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

कोल्हापूर, दि. 5 : 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही…

Read More

कास-कांदाटी-कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने

जैवविविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार व त्या सभोवतालच्या परिसराची नजाकत काही औरच आहे. दरवर्षी कास व आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो. साधारणतः ऑगस्ट मध्य ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपर्यंत या परिसरात नैसर्गिक फुले भरपूर असतात. या फुलांचा बहर ओसरला की दिसते फक्त…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभाकरीता केलेल्या अर्जाच्या मूळप्रती सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरीता http://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी अर्जाची मुळप्रत व त्याअनुषंगिक कागदत्राच्या दोन प्रती १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे. महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुॠण वित्त…

Read More

उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील

सातारा दि. 4 : उद्योग क्षेत्राची कमी माहिती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकजण उद्योजकतेकडे वळण्यात मागे पडतात. त्यामुळे युवक, युवतींमध्ये उद्योजकतेचे प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेऊन अमृत संस्थेने हे महत्वकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील…

Read More

इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा दि. 3 : शालांतपूर्व इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येते. या योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण…

Read More

ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत सर्व शेतकऱ्यांची नोंदणी होण्यासाठी योग्य नियोजन करा -प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

• प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणार शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोल्हापूर, दि.3 : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना होण्यासाठी जिल्ह्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांची नोंदणी होण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय…

Read More
error: Content is protected !!