महावितरणचा नवा नियम लागू; दोन महिने विजबिल थकवल्यास सुरक्षा ठेवीतून कपात, अन्यथा वीजपुरवठा खंडित!

पुणे:  महावितरणने १५ जुलैपासून वीज (औद्योगिक व व्यावसायिक) ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, दोन महिने सलग विजबिल थकवल्यास थकबाकीची रक्कम थेट ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून कपात केली जाणार आहे.

जर ग्राहकाने सुरक्षा ठेवीची रक्कम भरलेली नसेल, तर ती तात्काळ जमा करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा, ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. एकदा कपात झाल्यानंतर, ग्राहकांनी प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम भरून ती पुन्हा पूर्ण करावी लागणार असून त्यानंतरच विजबिलाची भरपाई करता येणार आहे.

थकबाकी न भरल्यास, संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. पुन्हा जोडणीसाठी थकबाकी तसेच सुरक्षा ठेवीची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. महावितरणने सांगितले की, या नव्या नियमाचा उद्देश वेळेवर थकबाकी वसुली सुनिश्चित करणे व थकबाकीदारांवर नियंत्रण ठेवणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!