पुणे, १३ मार्च २०२५: पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज जिल्हा परिषद, पुणे येथील बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. कार्यकारी अभियंता बाबुराव पवार, उपअभियंता दत्तात्रेय पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी सरकारी कंत्राटदाराकडून तब्बल २,५४,००० रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी १,४२,००० रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.प्रकरणाचा तपशील:तक्रारदार हा सरकारी ठेकेदार असून, दौंड तालुक्यातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी ४० लाख रुपयांचे टेंडर मिळाले होते. काम पूर्ण केल्यानंतर बिल मंजुरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली.कार्यकारी अभियंता बाबुराव पवार (वय ५७) आणि उपअभियंता दत्तात्रेय पठारे (वय ५५) यांनी बिलाच्या २% प्रमाणे प्रत्येकी ८०,००० रुपये मागितले.कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे (वय ३७) यांनी एस.क्यू.एम. अहवाल मंजुरीसाठी १४,००० रुपये लाच मागितली.तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार १० मार्च रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली, त्यानंतर ११ मार्च रोजी पडताळणी दरम्यान तडजोडीअंती लाच रक्कम १,४२,००० रुपये निश्चित करण्यात आली.अटक आणि पुढील कारवाई:१३ मार्च रोजी सापळा रचून अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांनी ६४,००० रुपये स्वीकारले.उपअभियंता दत्तात्रेय पठारे यांनी ६४,००० रुपये आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांच्यासाठी १४,००० रुपये स्वीकारले.अतिरिक्त चौकशीत बाबुराव पवार यांच्या सरकारी दालनात ८.५८ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली, जी अधिक तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.या अधिकाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांचे आवाहन:कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा:फोन: ०२०-२६१२२१३४ / २६१३२८०२व्हॉट्सअॅप: ९९३०९९७७००ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.inवेबसाइट: www.acbmaharashtra.gov.in(पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.)
Pune top news satyaupasak