महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४: शिक्षक पात्रता परीक्षेच्या उत्तरसूचीत काही आक्षेप असल्यास, ते १६ डिसेंबरपर्यंत परिषदेला कळवावेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत परिषदेकडे पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.आक्षेप त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील.

आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने, ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत ऑनलाईन प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही श्रीमती ओक यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!