महाराष्ट्रातील प्लेसमेंट एजन्सींवरील नियंत्रण: युवकांच्या संरक्षणाचा खरेच उपाय की केवळ दिखाऊ पाऊल?
राज्यात अनेक बनावट प्लेसमेंट एजन्सी आहेत, ज्या तरुणांना भरघोस नोकऱ्यांचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक २०२५ संमत केले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ सरकारने मोठे दावे केले आहेत—जसे की रोजगार क्षेत्रात…