कृषी विभागात धोरणात्मक गोंधळ? निविष्ठा व गुण नियंत्रण विभागात बिघाड!
गुणनियंत्रणावर गंडांतर! ‘गुणनियंत्रण’चा आधारच काढला? पुणे, दि. १ जुलै: खरीप हंगाम सुरू होत असताना, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षकांच्या अधिकारांमध्ये राज्य शासनाने मोठा फेरबदल करत केवळ ४७८ अधिकाऱ्यांनाच तपासणीसाठी अधिकृत मान्यता दिली आहे. ही नवीन अधिसूचना दिनांक १९ जून २०२५ रोजी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आली असून,…