लाडकी बहीण योजनेत आजी-भावांची एंट्री, ४५३ कोटींची उचल!
“लाडक्या बहिणीच्या नावाखाली… आजी बाई आणि भाऊ घेऊन गेले ४५३ कोटी! आता सरकार म्हणतंय ‘योजना बरोबर होती, फक्त लाभार्थी थोडे ‘क्रिएटिव्ह’ निघाले!’” राज्यात निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं मोठ्या थाटामाटात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना काढली, २१ ते ६५ वयातील बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जात होते, योजनेचा उद्देश होता महिलांना आर्थिक मदत देण्याचा…