कोल्हापूर, दि. 14 : कडधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत राष्ट्रीय बीज निगम पुणे या पुरवठादार संस्थेमार्फत मसूर ( वाण- कोटा मसूर, मसूर एल-4727) पिकाच्या 400 संख्या बियाणे मिनी किटच्या प्रायोगिक तत्वावर पुरवठा करण्यात आला आहे.
मसूर बियाणे मिनी किट सोबत जैविक खते तसेच लागवड तंत्रज्ञान व वाणाविषयक माहिती असलेल्या घडीपत्रिका शेतकऱ्यांना दिली आहे. जिल्ह्यातील इच्छुक वैयक्तिक, प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांना विनामुल्य मसूर बियाणे मिनी किटचे वाटप करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील 400 लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून 106 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात आले आहे. प्रात्यक्षिक क्षेत्राचे कृषि किसान मोबाईल ॲपव्दारे Geo-Tagging करण्यात येणार आहे. तसेच वाटप करण्यात आलेल्या मिनी किटमध्ये तुलनात्मक पिक कापणी प्रयोगाव्दारे उत्पादन क्षमता पाहिले जाणार आहे. तरी तांत्रिक माहितीसाठी आपण संबंधित तालुक्यातील कृषि विभागाशी तसेच गावपातळीवर कृषि सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक नामदेव परीट व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
प्रति 100 ग्रॅम मसूरमध्ये असणारे पोषणमुल्य पुढीलप्रमाणे आहे. उर्जा (kcall) 346, प्रोटीन (g) 27.2, फॅट (g) 1.0 कार्बोहायड्रेट (g) 60, फायबर(%) 11.5 या प्रमाणे असतात. चंदगड 200 संख्या, गडहिग्लज 100 संख्या व आजरा तालुक्यास 100 संख्या असे एकूण 400 संख्या (प्रति मिनी किट 8 किलो याप्रमाणे-32 क्विंटल इतके मसूर बियाणे मिनी किटचे लक्षांक देण्यात आले. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे.
गडहिंग्लज – वाण- कोटा मसूर, बियाणे मिनी किट (संख्या)-100, बियाणे मात्रा (क्विंटल) (प्रति मिनी किट 8 किलो) 8.00,
चंदगड– वाण- कोटा मसूर, बियाणे मिनी किट (संख्या)-200, बियाणे मात्रा (क्विंटल) (प्रति मिनी किट 8 किलो) 16.00,
आजरा– वाण- एल-4727, बियाणे मिनी किट (संख्या)-100, बियाणे मात्रा (क्विंटल) (प्रति मिनी किट 8 किलो) 8.00 या प्रमाणे आहे.