बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी – जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी आणि गावोगावी फिरणाऱ्या एजंटांकडून कोणतीही खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले….