Frequent reshuffles end as Dr. B A Pawar takes charge DD

आरोग्य विभागातील गोंधळानंतर स्थैर्य, अखेर पुणे मंडळाला पूर्णवेळ उपसंचालक…

डॉ. भगवान पवार यांची बदलीने नियुक्ती!

मुंबई, दि. २२: आरोग्य विभागातील सततच्या अतिरिक्त कार्यभार बदलानंतर अखेर पुणे मंडळाला पूर्णवेळ उपसंचालक मिळाले आहेत. शासनाने डॉ. भगवान अंतु पवार, सहाय्यक संचालक (वैद्यकीय), मुंबई मंडळ, ठाणे यांची बदली करून त्यांची नियुक्ती उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या पदावर केली आहे.

यापूर्वी उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ या पदाच्या कार्यभाराबाबत वारंवार फेरबदल होत होते. सुरुवातीला कार्यरत असलेले डॉ. राधाकिशन बाबुराव पवार यांची बदली उपसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग), पुणे या पदावर करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांच्याकडेच पुणे मंडळाचा अतिरिक्त कार्यभार ठेवण्यात आला. पुढे काही दिवसांतच शासनाने यू-टर्न घेत तो कार्यभार डॉ. प्रशांत वाडीकर, सहायक संचालक (वैद्यकीय) यांच्याकडे सोपवला. त्यानंतर पुन्हा कार्यभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यंपल्ले यांच्याकडे देण्यात आला होता.

मात्र अखेर या पदासाठी रीतसर बदली करून डॉ. भगवान अंतु पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच पुणे महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी काम केले असल्याने पुणे मंडळातील आरोग्य सेवा व्यवस्थापनाचा त्यांना थेट अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे विभागातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आरोग्य यंत्रणेत सतत झालेल्या या बदलांमुळे निर्माण झालेला गोंधळ आता स्थिरावण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!