From Classroom to Fields RAWE Begins in Nandur

नांदूरमध्ये कृषिकन्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ…

नांदूर (ता. दौंड, जि. पुणे):

कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषिकन्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) नांदूर येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील शेती, शेतकरी जीवनशैली तसेच कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना शेतीतील प्रत्यक्ष समस्या, आधुनिक व पारंपरिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, पशुपालन, मृदासंवर्धन तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा अनुभव देणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कृषिकन्या अनुजा पांचाळ, जान्हवी पाटील, ऋतुजा पाटील, रिया पोतदार, प्रणिता साखरे, भाग्यश्री शेंडे, निहारीका शिंदे आणि गायत्री मासाळकर यांचे स्वागत केले.

यावेळी गावातील माजी सरपंच, पोपटराव बोराटे, पोलीस पाटील नेहा बोराटे, प्रविण बोराटे, कृषी सहाय्यक विनायक जगताप, मा‌.चेअरमन सखाराम बोराटे, रामदास बोराटे,पोपट बोराटे, मुकेश कोकरे,सोमनाथ बोराटे व अन्य ग्रामस्थ, महीला उपस्थित होते.

कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत पिकांची सद्यस्थिती, खत व पाणी व्यवस्थापन, उत्पादन खर्च व उत्पन्न याची माहिती घेतली. यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, संतुलित खत वापर आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. एस. माने, केंद्र समन्वयक डॉ. एस. एस. खांडवे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एस. वाघधरे यांचे मार्गदर्शन लाभत असून, या दरम्यान नांदूर येथील माजी सरपंच युवराज बोराटे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी या उपक्रमास सक्रिय सहकार्य करत असून, हा उपक्रम शेती आणि शिक्षण यांचा दुवा अधिक मजबूत करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!