Nandur Society Polls Borate, Thorat Elected Unopposed

नांदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत चेअरमन पदी नूतन बोराटे, व्हाईस चेअरमन पदी दौलत थोरात यांची बिनविरोध निवड

नांदूर (ता. दौंड) जि.पुणे,दि.७: नांदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नूतन देविदास बोराटे आणि व्हाईस चेअरमनपदी दौलत लक्ष्मण थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी राजभोज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सोसायटीचे सचिव कैलास कोळपे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यापूर्वीचे चेअरमन बापू गायकवाड व व्हाईस चेअरमन ज्ञानदेव थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली. कोणत्याही विरोधाविना ही निवडणूक पार पडल्याने सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी माजी चेअरमन पोपटराव बोराटे, माजी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल घुले, माजी सरपंच युवराज बोराटे, पोलीस पाटील नेहा बोराटे, माजी सरपंच रेश्मा बोराटे, माजी उपसरपंच मयूर घुले यांच्यासह बापू गायकवाड, सखाराम बोराटे, प्रशांत बोराटे, प्रविण बोराटे पाटील, नंदकुमार थोरात, ज्ञानदेव थोरात, दत्तात्रय बोराटे, लक्ष्मण थोरात, देविदास बोराटे, विजय थोरात, निलेश थोरात, निखिल बोराटे, गणेश थोरात, प्रमोद थोरात, बाळासाहेब होले, देविदास जाधव, समीर होले, चाचा बहिरट आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन नूतन बोराटे व व्हाईस चेअरमन दौलत थोरात यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक व सभासदहिताच्या दृष्टीने काम करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!