शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फलोत्पादन विकास व राष्ट्रीय कृषी विकास योजनांचा लाभ घ्या…

पुणे,दि ३ : वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर संरक्षित शेती हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. भाजीपाला व फुलपिकांचे उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहासारखी संरक्षित शेती तंत्रे उपयुक्त ठरत आहेत. यामुळे कमी क्षेत्रात 3 ते 4 पट अधिक उत्पादन मिळते. शेतकऱ्यांचा संरक्षित शेतीकडे वाढता कल लक्षात घेता, राज्य सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

या योजनांतर्गत खालील प्रमाणे अनुदान व खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे:

🌿 हरितगृह (OVPH)खर्चाचा मापदंड: ₹1000 ते ₹1200 प्रति चौ.मी.अनुदान: 50% (उदा. 25 गुंठे – ₹12.50 लाख)क्षेत्र मर्यादा: 500 ते 2500 चौ.मी.

🌿 हरितगृह (CCPH)खर्चाचा मापदंड: ₹1500 ते ₹1800 प्रति चौ.मी.अनुदान: 50% (उदा. 25 गुंठे – ₹18.75 लाख)क्षेत्र मर्यादा: 500 ते 2500 चौ.मी.

🌿 शेडनेटगृहखर्चाचा मापदंड: ₹710 प्रति चौ.मी.अनुदान: 50% (उदा. 25 गुंठे – ₹8.87 लाख)क्षेत्र मर्यादा: 500 ते 2500 चौ.मी.

🌿 प्लास्टिक मल्चिंगखर्चाचा मापदंड: ₹4 प्रति चौ.मी.अनुदान: ₹20,000 प्रति हेक्टर (50%)क्षेत्र मर्यादा: 2 हेक्टर

नव्याने समाविष्ट घटक:

फळांना कव्हर (Fruit Cover): ₹50,000 खर्च/हेक्टर, 50% अनुदान

तण नियंत्रक अच्छादन (Weed Mat): ₹2 लाख खर्च/एकर, 50% अनुदान

हायड्रोपोनिक्स/एरोपोनिक्स: ₹3.5 लाख खर्च/10 गुंठे, 50% अनुदान

विशेष बाब: अनुसूचित क्षेत्रासाठी 15% अधिक खर्चाचा मापदंड लागू.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, 7/12, 8-अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास), हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा इ.

अर्ज प्रक्रिया:

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील फलोत्पादन घटकात अर्ज करावा:🔗 https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agriloginअधिक माहितीसाठी राज्य कृषी विभागाचे संकेतस्थळ पाहावे:🔗 http://krishi.maharashtra.gov.inतसेच, नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजना आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीसह मोठी संधी आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!