वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली; चौकशी मात्र कायम
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आज (ता. 30) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढत त्यांची यवतमाळ येथील पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून बदली केली आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळातील गैरकारभाराची चौकशी सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विजयसिंह नलावडे…