केंद्राच्या नियमांना फाटा देत राज्य सरकारचा फतवा!
फक्त तीन अधिकाऱ्यांनाच तपासणी अधिकार! केंद्र शासनाच्या विधिमान्य कायद्यांना बाजूला ठेवत राज्य शासनाचे परिपत्रक? सत्यउपासक संपादकीय… महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने २० जून २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आता फक्त तीनच अधिकाऱ्यांना कृषी निविष्ठांचे (बियाणे, खते, कीटकनाशके) सॅम्पल घेण्याचे आणि दुकाने तपासण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे अधिकारी म्हणजे – विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक (विभागस्तर), जिल्हा गुण…