Ward 35 Creates History with Unopposed Election

सनसिटी– माणिकबागमधून भाजपचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे बिनविरोध!

पुणे,दि.२: पुणे महानगरपालिकेच्या लोकशाही इतिहासात प्रथमच एका प्रभागातून दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी–माणिकबाग येथून भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे हे दोघेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान इतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यामुळे निवडणूक न होता थेट निकाल लागल्याने या प्रभागात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. सुशिक्षित व सुसंस्कृत मतदारसंघ अशी ओळख असलेल्या सनसिटी–माणिकबाग प्रभागात घडलेली ही घटना पुण्याच्या महापालिका निवडणुकांच्या इतिहासात मैलाचा दगड मानली जात आहे.

या बिनविरोध निवडीमुळे भारतीय जनता पक्षाची या प्रभागावरील पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद आणि राजकीय वर्चस्वाचे प्रतिबिंब या निकालातून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!