अबब! जिल्हा परिषदेला लागली भ्रष्टाचाराची घुस, जिल्हा परिषदेत लाचखोरीचा कळस!

शवदाहिनी खरेदी घोटाळा, मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणीही सोडलं नाही! पुणे,दि.१४: पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागातील स्मशानभूमींसाठी खरेदी केलेल्या ४३० शवदाहिनी संचांमध्ये तब्बल ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती सत्यउपासक टीमला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सविस्तर वृत्त पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागातील स्मशानभूमींसाठी ४३० शवदाहिनी संच खरेदी करण्याकरिता जेम पोर्टलवर शवदाहिनी खरेदी…

Read More

जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा – कृषि विभाग

पुणे,दि.१४: पुणे जिल्हा अंतर्गत कृषि विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध रासायनिक खतांचा एकूण 79440 मेट्रिक टन इतका आवश्यक साठा उपलब्ध आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: युरिया: 22109 मेट्रिक टन, डीएपी: 3277 मेट्रिक टन, एमओपी: 4519 मेट्रिक टन, संयुक्त खते: 37694 मेट्रिक टन, एसएसपी: 9708 मेट्रिक टन कृषि विभागामार्फत शेतकरी बांधवांना एकाच प्रकारच्या खताची…

Read More

UDAY 2.0 योजनेत सुधारणा व कृषीक्षेत्रासाठी सतत वीजपुरवठा हवा – देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारचा स्मार्ट मीटरिंग प्रकल्पांसाठी निधीचा निर्णय; ‘नेट झिरो उत्सर्जन’ लक्ष्याकडे ऊर्जा क्षेत्राची पाऊलवाट… मुंबई,दि.१३: पश्चिम क्षेत्र प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषदेत आज ऊर्जा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सर्व राज्यांना स्मार्ट मीटरिंग प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर स्थापनेला प्राधान्य देण्याचे निर्देश…

Read More

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताचा करारा वार! ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला.

जय हिंद! भारताची ‘सर्जिकल स्ट्राइक 2.0’; दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त… नवी दिल्ली | 7 मे 2025: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली, आणि बहावलपूर परिसरात असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर…

Read More

राज्यात उद्या १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिल

हवाई हल्ल्याचा सायरन, ब्लॅकआऊट, नागरी संरक्षण प्रशिक्षण; गृह मंत्रालयाचा आदेश मुंबई, दि. ६ मे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना ७ मे रोजी मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातही या पार्श्वभूमीवर १६ महत्त्वाच्या ठिकाणी ही…

Read More

राजमाता अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची‌ ऐतिहासिक बैठक…

चौंडीला ५ हजार कोटींच्या घोषणा‘, पण कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय? अहिल्यानगर,दि.६: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 5000 कोटींच्या योजनांचे विभागनिहाय पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले, सांस्कृतिक कार्य विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मितीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्य साधून, त्यांच्या…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७% आरक्षण कायम; निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी २७% राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची अधिसूचना जारी करण्याचे आणि पुढील चार महिन्यांत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशानुसार, स्थानिक…

Read More

शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फळबाग लागवड योजनेतून अनुदानाची संधी! पुणे, दि. ६: शेतकऱ्यांनी आधुनिक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीकडे वळण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे….

Read More

राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना; मचाणावरून वन्यजीवन निरीक्षणाची वन प्रेमींना संधी

बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना; वनप्रेमींना जंगलात एक अनोखा अनुभव घेण्याची संधी; सहभागासाठी अर्ज मुदत ५ मे पर्यंत… कोल्हापूर, ३ मे: कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुध्द पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ व १३ मे २०२५ रोजी राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि स्वयंसेवकांनी ५ मे २०२५ पर्यंत…

Read More

ग्रामीण भागातील बेरोजगार युवक व पशुपालकांसाठी मोठी संधी – पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

पुणे, दि. ३ मे: ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २ मे २०२५ ते १ जून २०२५ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे. पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी…

Read More
error: Content is protected !!