ऐन हंगामात संचालक बदल! सुनील बोरकर हटणार?
सेवा ज्येष्ठता वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी; किरनळींची संचालकपदी शक्यता! पुणे, दि. २ जुलै: राज्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागात वरिष्ठ पातळीवर बदलांची हालचाल सुरू झाली असून २७ मे २०२५ रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कृषी विभागाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदावरून सुनील बोरकर यांना हटविण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचे सूत्रांकडून समजते…