कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार – जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर
सोलापूर, दिनांक 20:- जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झालेली असून या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. कामती तालुका मोहोळ येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्र येथे…

