कृषी विभागाची ठोस कारवाई ;अवैध खत साठ्यावर छापा
विनापरवाना रासायनिक खत साठा जप्त : 4.61 लाखांचा साठा पकडला, गुन्हा दाखल धाराशिव : वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले 456 पोते (सुमारे 20 मेट्रिक टन) रासायनिक खत जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत सुमारे 4.61 लाख रुपये असून, सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी…