Katkar Takes Charge Pune JDA

पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालकपदी सुभाष काटकर!!!

सत्यउपासक वृत्त/ पुणे: राज्यात दुष्काळी स्थिती असून राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पाहणी करता दिल्लीहून केंद्रातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांचे पथक राज्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालक या रिक्त पदी सुभाष काटकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार बाबासाहेब जेजुरकर यांच्याकडे सहसंचालक (विस्तार) या मूळ पदासोबत होता, आता त्यांच्या जागी नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत नियमित प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया केली जात नाही. मात्र, राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती, खरीप पिकांचे नुकसान, आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांसमोरील विविध गंभीर प्रश्न लक्षात घेता कृषी विभागातील महत्त्वाच्या पदांवर नियमित अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे खरीप नुकसानीचे काम, रब्बी हंगामाचे नियोजन, शेतकरी मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत प्रशासकीय निर्णय सातत्याने घेणे शक्य होईल. याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर महत्त्वाच्या पदांवरील अतिरिक्त कार्यभारही नियमित अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुभाष काटकर यांची नाशिकहून पुणे विभागीय कृषी सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याने पुणे विभागाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. दुष्काळी परिस्थिती, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील विविध प्रश्नांमुळे कृषी यंत्रणेची कसोटी लागली असताना आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. नाशिक विभागातील कामकाजासह यापूर्वी पुणे विभागात केलेल्या कामाचा अनुभव आणि कृषी विभागातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना मिळालेला व्यापक अनुभव याचा सद्यस्थितीत पुणे विभागाला निश्चितच फायदा होण्याची अपेक्षा असून त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे प्रतिसाद देत कृषी विभागाचे कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!