कृषी निविष्ठा तपासणीसाठी सुधारित कार्य विभागणी!

निविष्ठा तपासणीस केवळ तिन अधिकाऱ्यांनाच मान्यता; शासनाचा निर्णायक निर्णय! पुणे दि,२० जून: राज्यातील कृषी निविष्ठा विक्री प्रणालीत पारदर्शकता व शिस्त आणण्यासाठी कृषी विभागाने एक ऐतिहासिक व निर्णायक निर्णय घेतला आहे. दिनांक २० जून २०२५ रोजी निर्गमित परिपत्रकान्वये आता फक्त तीनच अधिकाऱ्यांना कृषी निविष्ठांचे नमुने घेण्याचा व दुकान तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे. हे अधिकारी म्हणजे;…

Read More

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवणारे ‘महाॲग्री-एआय धोरण’!

डिजिटल युगातील शेतीसाठी राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय! महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ मंजूर… मुंबई,दि. १८ जून: महाराष्ट्र सरकारने शेतीच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या ‘महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५–२०२९’ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून सशक्त करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा…

Read More

शासन निर्णय, सेवा नियमांची पायमल्ली; उच्चपदस्थांचा लाखोंचा अपहार!

पुणे तिथे काय उणे;नियम झुगारून अधिकारांचा दुरुपयोग! पुणे,दि.१८ जून: शासन निर्णय झुगारून, सेवा नियमांची कत्तल करत पुणे महानगरपालिकेतील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि माजी मुख्य लेखापरीक्षक यांनी लाखो रुपयांचा मानधन अपहार केल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकाराच्या (RTI) माध्यमातून उघडकीस आले आहे. “सेवेत राहा आणि मानधन घ्या” या बिनधास्त वृत्तीने प्रशासकीय नीतिमत्तेलाच चाट लावणाऱ्या या प्रकरणाने प्रशासनाच्या…

Read More

नीरा डावा कालव्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मान्सूनपूर्व भगदाड दुरुस्त; नीरा डावा कालवा पूर्ववत, पालखी सोहळ्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत… कालवा फुटल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दुरुस्ती पूर्ण; पुणे पाटबंधारे विभागाची कौतुकास्पद कामगिरी! बारामती,दि.१६: मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारामती तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लिमटेक परिसरातील नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटण्याची घटना घडली होती. बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे…

Read More

जीर्ण पुलाची जीवघेणी किंमत; इंद्रायणीच्या प्रवाहात विरले प्राण!

इंद्रायणी दुर्घटनेने उभा केला खळबळजनक प्रश्न; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी? पुणे (कुंडमळा ता. मावळ), दि. १५ जून – तळेगावनजीक इंदोरी गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीवरचा जुना लोखंडी पूल आज दुपारी अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर ५१ जण जखमी झाले असून, यामध्ये ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे २० ते…

Read More

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव!

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात क्रांतीचा निर्धार; पुण्यात ‘पुणे मॉडेल स्कूल’ आणि ‘मॉडेल आरोग्य केंद्र’ उपक्रमांचे लोकार्पण… शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे; शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन! पुणे, दि.१४: बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर…

Read More

औंध जिल्हा रुग्णालयात शवगृहाची दयनीय स्थिती…

औंध जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात अमानुष अवस्था; मृतांनाही मिळत नाही सन्मान; प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे नातेवाईकांची ससेहोलपट! पुणे,दि.१४: पुणे शहरात ससून रुग्णालयावर वाढलेल्या ताणामुळे पर्यायी म्हणून औंध जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जात असले, तरी येथे मृतदेहांबाबतची व्यवस्था अक्षरशः धक्कादायक आहे. अर्ध्याहून अधिक पुणे जिल्ह्यातील शव औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले जातात. मात्र, येथे असलेल्या शवगृहातील ६ शितपेट्यांपैकी फक्त…

Read More

महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू; प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर

४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार! पुणे, दि. १३ जून २०२५: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये पुढील काही महिन्यांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, या निवडणुकांपूर्वी महत्त्वाच्या टप्प्यापैकी असलेल्या प्रभाग रचना प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार, ११ जूनपासून सुरू झालेली प्रक्रिया ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीचा बिगुल!

राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ‘प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर… मुंबई, दि. १२ जून २०२५: राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत देत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक (सदस्य…

Read More

औंध जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी घोटाळा उघड; निष्क्रीय जिल्हा शल्यचिकित्सकाच्या हकालपट्टीची मागणी तीव्र

पुणे – औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेऐवजी खाजगी संस्थांना पाठीशी घालणारा आणि अनेक गंभीर गैरप्रकारांवर दुर्लक्ष करणारा जिल्हा शल्यचिकित्सक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आले असून, त्याची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी आता आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून आणि सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात औंध जिल्हा रुग्णालयात रक्ताची…

Read More
error: Content is protected !!